अंगावर काटा आणणारं वास्तव ! लेकाचा मृत्यू. गतिमंद आई - वडिल, भावाला कल्पनाच नाही, आजही 'त्याच्या' प्रतिक्षेत


औंढा नागनाथ शहरातील नागनाथ मंदिराच्या परिसरातील लोखंडी गेट पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरामध्ये पूर्व द्वारामोरील पत्राच्या शेडला लोखंडी गेट लावण्यात आले होते. तो गेट तरुणाच्या अंगावर पडल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असल्याने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



सोमनाथ अरुण पवार (वय 12 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर बंद असल्याने त्या परिसरामध्ये कोणीही फिरकत नाही. परंतु लहान मुले तिथे खेळण्यासाठी जात असतात. सोमनाथ सकाळच्या दरम्यान तिथे खेळायला गेल्याने अचानक लोखंडी गेट त्यांच्या अंगावर पडला. त्यानंतर तो गेट खाली दबला गेल्याने त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी तात्काळ परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवजड गेट उचलून सोमनाथला बाहेर काढले. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु अवजड लोखंडी गेट उचलेपर्यंत खाली दबून सोमनाथ याचा जागीच मृत्यू झालेला होता. घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

© Divyang Mitra. All rights reserved. Premium By Tech Bangla Info