शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (Pre Matric Scholarships Scheme) जिल्हा समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण विभाग मार्फत दिली जाते. यामध्ये वेगवेगळ्या दिव्यांग प्रवर्गाचा समावेश होतो. ही योजना सर्व जिल्ह्यात राबविली जाते.
शासन निर्णय
दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता मार्गदर्शक सूचना.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिव्यांग प्रकाराचा समावेश झाला आहे
नवीन अर्ज नमुना
दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता मार्गदर्शक सूचना.
- अर्जदार प्राथमिक इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारा असावा.
- कर्णबधिर विद्यार्थ्यांना पायरीवर्गापासून या योजनेचा लाभ घेता येईल.
- मतिमंद व मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्यांना येथे वर्गाचा निकष न लावता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदाच्या विशेष शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल.
- अर्जदार शासन अनुदानित वस्तीगृहात अथवा अनुदानित निवासी शाळेतील विद्यार्थी नसावा.
- अर्जदार हा सामान्य शाळेत अथवा अपंगाच्या विशेष शाळेत शिक्षण घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार एकाच वर्गात एकापेक्षा जास्त वेळा आणि अनुतीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.
- अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेला नसावा.
- या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा राहणार नाही.
- नव्याने अर्ज केलेल्या अर्जदारास नवीन अर्जदार समजून सदर अर्जदारास दहा महिन्यांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
- गतवर्षी शिष्यवृत्ती मिळालेल्या अर्जदारास नूतनीकरण अर्जदार बारा महिन्यांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
- इयत्ता आठवी या वर्गातील विद्यार्थी हा नवीन अर्जदार गृहीत धरून नवीन अर्ज करावा.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिव्यांग प्रकाराचा समावेश झाला आहे
- अंशतः अंध
- अंध
- अस्थिविकलांग
- कुष्ठरोगमुक्त
- कर्णबधिर
- मतिमंद
- दिव्यांगाच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी
नवीन अर्ज नमुना
- अपंगत्व प्रमाणपत्र झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- मागील वर्षाच्या वर्गाची गुणपत्रिका झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- पूर्णपणे भरलेला वरील नवीन अर्ज
- अपंगत्व प्रमाणपत्र झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- मागील वर्षाच्या वर्गाची गुणपत्रिका झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- पूर्णपणे भरलेला वरील नूतनीकरण अर्ज
